भाविकांना अडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपी गजाआड करण्यात पोलसांना यश!
मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर दि.२३ (प्रतिनिधी):-भाविकांना अडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपी गजाआड करण्यात पोलसांना यश! आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबतची सविस्तर माहिती अशी की
दि.२८/१/२०२१ रोजी फिर्यादी श्री.आदित्य अविनाश आळेकर वय २१ वर्ष रा.इंद्रप्रस्थ कॉलनी बुऱ्हानगर तालुका नगर,हे देव दर्शनासाठी जात असताना अज्ञात दोन इसमांनी मोटारसायकल वर येऊन फिर्यादीचे वाहन आडून शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादीचे खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १७,४००/रू.किं.चा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला होता.सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं.१६२/२०२२ भादविक ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री.मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोलिस निरीक्षक श्री.अनील कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना मोटरसायकलवरून जबरी चोरी करणारे आरोपींच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याबाबत आदेश दिले होते.नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि.दिनकर मुंडे,पोसई.सोपान गोरे,पोहेकाँ.फकिर शेख, देवेंद्र शेलार विशाल दळवी,विजय ठोंबरे,शंकर चौधरी,रवी सोनटक्के, दीपक शिंदे,आकाश काळे,चापोहेकाँ.चंद्रकांत कुसळकर अशा अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करून आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक तात्काळ रवाना केले.पोलिस अधिकारी व अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सपोनि.शिशिर कुमार देशमुख व पोलीस स्टाफ यांच्यासह पेट्रोलिंग करत असताना फिरून मोटरसायकलवरून जबरी चोरी करणारा असल्याची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक श्री.अनील कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी नामे १)सचिन चव्हाण रा.चोभा निमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो निंबोडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे मिळतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.कटके यांनी मिळालेली माहिती पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कळविली माहिती प्राप्त होताच पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी निंबोडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपी नामे सचिन चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला त्याने त्याचे नाव सचिन गोपीनाथ चव्हाण वय 23 वर्ष राहणार चोभा निमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड असे सांगितले.त्याच्याकडे वर नमूद गुन्हाबाबत चौकशी करता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याचा अधिक विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या गावातील साथीदार नामे २) रघुनाथ बर्डे राहणार चोभा निमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली सदर माहितीनुसार आरोपी नामे रघुनाथ बर्डे यांचा राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला. त्यास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथील गु.र.नं.१६२/२०२२ भादविक ३९२,३४ सदर गुन्ह्यात वापरलेली आरोपींनी मोटरसायकल चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ३७,५०० रू.किं.चे मुद्देमालासह ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.