कौतुकास्पद

परप्रांतीयाला निर्जनस्थळी नेऊन त्याचा निघृण खुन करणा-या सराईत गुन्हेगारांना जेरबंद दोन दिवसात एमआयडीसी पोलीसांनी केली खुनाची उकल

अहमदनगर दि. 9 डिसेंबर (प्रतिनिधी )
दिनांक ०७/१२/२०२३ रोजी फिर्यादी दुर्गादेवी ओमप्रकाश महतो वय-३० वर्ष वार्ड नंबर २० गाव छठिया पोखरा पोस्ट डुमराव बक्सर बिहार हल्ली राहणार शिवालय कंपनी एमआयडीसी अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०६/१२/२०२३ रोजी रात्री ०८/०० ते दिनांक ०७/१२/२०२३ रोजी सकाळी ०८/३० वा चे दरम्यान माझे पती नामे ओमप्रकाश राबचना महतो वय-३५ वर्ष यांचा प्लॉट नंबर एफ ७१ चे पाठीमागे एमआयडीसी अहमदनगर येथे कोणीतरी अज्ञात आरोपीनी अज्ञात कारणाकरीता त्यांचे डोक्यात पाठीमागुन वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जिवंत ठार मारले आहे वैगरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर ११०३/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी १) विश्वास नामदेव गायकवाड वय्-२४ वर्ष रा. श्रीस्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर २) अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट वय-२३ वर्ष रा. पिंपळगाव कौडा ता.जि. अहमदनगर यांनी केला असुन ते औरंगाबाद कडुन अहमदनगर च्या दिशेने येत आहेत. त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन चे तपास पथक सदर आरोपींना पकडण्याकरीता रवाना केले. वरील आरोपी हे हॉटेल इंद्रायणी कडुन तपोवन रोडकडे येत असतांना पडक्या महालाजवळ तपोवन रोड येथे सापळा लावला. आरोपी हे विना नंबरच्या स्कुटीवर येत असतांना ते पोलीसांना पाहुन पळुन जावु लागले त्यावेळी सपोनि राजेंद्र सानप व तपास पथकातील अमंलदार यांनी सदर आरोपींना शिताफीने पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) विश्वास नामदेव गायकवाड वय-२४ वर्ष रा. श्रीस्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर २) अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट वय-२३ वर्ष रा. पिंपळगाव कौडा ता. जि. अहमदनगर ३) राहुल अशोक धोत्रे वय-२६ वर्ष. रा बजाजनगर ता जि छत्रपती संभाजीनगर अशी सांगीतले. सदर आरोपींना पोलीस स्टेशनला घेवुन येवुन त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले यातील परप्रातर्तीय मयत नामे – ओमप्रकाश राबचना महतो याचे व आमचे दारु पिउन भांडणे झाले होते त्यावरुन आम्ही त्याचे डोक्यात लाकडी दांडके मारुन त्याला जिवंत ठार मारले असे सांगुन सदर गुन्हयाची कबुली दिली आहे त्यामुळे सदर आरोपीतांना गुन्हयात अटक केली आहे. सदरचे तीनही आरोपी हे सराईत असुन त्यांचेविरुदध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.१) आरोपी नामे विश्वास नामदेव गायकवाड वय-२४ वर्ष रा.श्रीस्टाईल चौक एमआयडीसी अहमदनगर याचेविरुदध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

-२) एमआयडीसी अहमदनगर पोस्टे गु रजि नंबर १२१/२०२१ भादवि कलम ३९५ प्रमाणे.

३) नगर तालुका पोस्टे गु रजि नंबर २८०/२०२० भादवि कलम ३९५,३९७,४२७ प्रमाणे. ४) तोफखाना पोस्टे गु रजि नंबर २०/२०२१ भादवि कलम ३९२,३९५,४२७,३४ प्रमाणे.

५) एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर ४७७/२०२३ भादवि कलम ३९२,३४, प्रमाणे.

६) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु. रजि नंबर १४८/२०१९ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे.

२) आरोपी  अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट वय-२३ वर्ष रा. पिंपळपाव कौडा ता. जि. अहमदनगर

हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुदध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) एमआयडीसी कुपवड पोस्टे सांगली गु रजि नंबर २२४/२०१९ भादवि कलम ४२०,४०७,४११,३४ प्रमाणे.

३) आरोपी  राहुल अशोक धोत्रे वय-२६ वर्ष रा बजाजनगर ता जि छत्रपती संभाजीनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुदध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

_१) एमआयडीसी वाळुंज पोस्टे गु रजि नंबर ४३३/२०१६ भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे.

२) देवगाव राजा पोस्टे औरंगाबाद गु. रजि. नंबर २१/२०१९ भादवि कलम ३७९ प्रमांणे.

३) एमआयडीसी वाळुंज पोस्टे गु रजि नंबर २६६/२०१९ मुंबई पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे. ४) एमआयडीसी वाळूज पोस्टे गु रजि नंबर १३४/२०२० भादवि कलम ३३८,५०४,३४ प्रमाणे.

५) एमआयडीसी वाळुज पोस्टे गु रजि नंबर २०८/२०१९ भार्दाव कलम ३३२४,४२७ प्रमाणे.

सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ नंदकुमार सांगळे, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोना साबीर शेख, पोना विष्णु भागवत, पोना राजु सुद्रिक, पोना महेश बोरुडे, पोना/संतोष नेहुल, पोकॉ किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, पोकॉ सचिन हरदास चापोहेकॉ गिरवले, तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकॉ/राहुल गुंड्डु, पोकॉ/ नितीन शिंदे पोकॉ/ज्योती काळे यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे