अहिल्यानगर दि. 7 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचा्रार्थ रामवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षते खाली व विजयराव वडागळे, सुनील शिंदे, रतन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची बैठक नुकतीच झाली.
यावेळी बोलतांना सुरेशभाऊ बनसोडे म्हणाले यापूर्वी या भागतील प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविले आहेत. आचार संहिते नंतर परत या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील,
या भागातील शौचालये, लाईट, त्याचप्रमाणे या भागातील पक्क्या घराचा प्रश्न आमदार जगताप यांच्या माध्यमातून सोडविला जाईल. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला अनु. क्रमांक 4 व घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने विजयी करावे. असे आवाहन त्यांनी या बैठकीच्या निमित्ताने केले. यावेळी याभागातील जेष्ठ नेते विजयराव वडागळे यांनी मनोगत व्यक्त करतांना आमदार संग्राम जगताप यांना मत म्हणजे विकासाला मत असे म्हणत आमदार संग्राम जगताप यांना भरपूर मतांनी विजयी करण्याची विनंती केली.
यावेळी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे म्हणाले याभागातील नागरिकांचे प्रश्न सुरेशभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडविले जातील.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना तिसऱ्यांदा बहुमतांनी निवडून द्यावे, असा मानस व्यक्त केला. यावेळी रतन परदेशी, सिद्धार्थ आढाव, नितीन घोरपडे, दिपक सरोदे, मीराताई सरोदे, आरपीआय आठवले गटाचे नेते नाना पाटोळे, सुजित घंगाळे, त्याचप्रमाणे रामवाडी भागातील महिला व तरुण कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी आम्ही आमदार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा