
*जिल्हा नियोजन समितीची बैठक 13 जानेवारी रोजी*
*अहमदनगर (प्रतिनिधी) दि. 06* – राज्याचे, ग्रामविकास व कामगार मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन कार्यकारी समितीची बैठक गुरूवार दि. 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, अहमदनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.