स्नेहबंध’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
पोलिस, आरोग्य, वन विभाग व बांधकाम क्षेत्रातील महिलांचा गौरव

अहमदनगर दिं.८ मार्च (प्रतिनिधी) पोलिस, आरोग्य, वन विभाग तसेच बांधकाम क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त सन्मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
८ मार्च महिला दिनानिमित्त तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, पोलिस उप निरीक्षक शुभांगी मोरे, आर्किटेक्ट मीनल अशोक काळे, १०८ रुग्णवाहिकेच्या जिल्हा व्यवस्थापिका कांचन बिडवे महिलांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, अशा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र शाल देऊन केला. याप्रसंगी पोलिस उप-निरीक्षक समाधान सोळंके, शिल्पकार बालाजी वल्लाल, बाळासाहेब बेरड, संकेत शेलार, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक गडकरी म्हणाल्या, एखाद्या देशाची प्रगती त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून सिद्ध होते. त्यामुळे स्त्रियांनो, स्वत:तील गुणांना ओळखा आणि पुढे जा. जग तुमच्या मागे येईल, असा सल्ला त्यांनी दिला.
एक महिला शिकली तर एक पिढी शिकते. त्यामुळे मुलींना शिक्षण द्या, घरातही महिलांचा सन्मान करा, महिलांनी आपले आरोग्य निरोगी, आनंदी राहण्यासाठी वेळेवर जेवण, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे आवाहन कांचन बिडवे यांनी केले.
*********
कर्तृत्ववान महिला समाजासाठी आदर्श : शिंदे
अनेक महिलांनी अडचणींवर मात करत कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. अशा अनेक कर्तृत्ववान महिला समाजासाठी आदर्श आहेत. या महिलांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे. महिलांनी ठरवले तर त्यांना प्रगतीपासून कुणीही अडवू शकत नाही आणि ती यशस्वी होऊन दाखवते, याचे उदाहरण म्हणजे आज सत्कार केलेल्या महिलांच्या कार्यावरून सिद्ध झाले आहे, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.