शिवजयंती जयंती निमित्त स्नेहबंधच्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी) येथील स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती निमित्त नगर शहराकरिता निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी दिली. ही स्पर्धा खुल्या गटासाठी आहे.
19 फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून साजरा केला जातो.
निबंध स्पर्धेसाठी विषय-
1) शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य 2) शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. 3) शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन 4) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणि लोकशाही. 5) शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य. 6) छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन.
चित्रकला ( चित्र रंगवणे ) स्पर्धा
1) छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र. 2) कोणत्याही एका किल्ल्याचे चित्र. 3) शिवकालीन वास्तू चित्र. 4) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक.
असे विषय आहेत. निबंध शब्द मर्यादा जातीत जास्त 1000 शब्दांपर्यंत असावी. निबंध व चित्र स्वतः लिहिलेले / काढलेले असावे. निबंधाच्या / चित्र च्या मागील बाजूस पूर्ण नाव,पत्ता तसेच मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा. निबंध स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके काढण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना शिवजयंती नंतर पारितोषिक देण्यात येईल. निबंध 19 फेब्रुवारी 2022 पर्यंत, पियुष फोटो & व्हीडिओ, 1063, शिवाजी चौक, भिंगार, अहमदनगर- 414002 या पत्त्यावर स्वतः किंवा पोस्टाने / कुरिअर ने पाठवायचे आहेत. अधिक माहिती साठी 8793191919 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.