दोन सराईत चोरट्यांना अटक , दोन चोरीच्या सायकल जप्त, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी.

अहमदनगर दि. ११ मार्च (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू असताना दिनांक 09/03/23 रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे ,PC सुरेश सानप,PC नवनाथ दहिफळे याना माहिती मिळाले वरून अभिषेक शाम शिंदे रा नव नागापूर व शैलेश संजय पवार राहणार वरवांडी तालुका राहुरी हे अडवाणी चौक एमआयडीसी येथे संशयीत रित्या चोरीच्या सायकली घेऊन फिरताना मिळून आलेने एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडील 6000 किमतीचा दोन चोरीच्या सायकल हस्तगत केल्या आहेत,आरोपी नि इतर साथीदारांसोबत आणखी मोटर सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे ,सदर आरोपींवर मुंबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेंद्र सानप, पो.हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे ,PN पांढरकर,PC सुरेश सानप,PC नवनाथ दहिफळे यांनी केलेली आहे.