निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशु पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवा : डॉ. उद्धव शिंदे स्नेहबंधने केली पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था

अहमदनगर (प्रतिनिधी) – सध्या उन्हाळा जाणवू लागला आहे. पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
वाढत्या उन्हामुळे पक्षांची अन्न व पाण्यासाठीची भटंकती थांबवण्यासाठी स्नेहबंध फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. उन्ह्याळ्यात पक्ष्यांसाठी छावणी परिषद कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल छावणी परिषद शाळा, बालघर प्रकल्प, म.न.पा शाळा-भूतकरवाडी, मूकबधिर शाळा-सावेडी, म.न.पा. जॉगिंग ट्रॅक तसेच विविध सरकारी कार्यालये, शाळा, हॉस्पिटल व इतर सार्वजनिक ठिकाणी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, रेडिओ सिटी चे आर जे प्रसन्न, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, बालघर प्रकल्प चे युवराज गुंड, मुख्याद्यापक डी के जगधने, मुख्याध्यापक राजू भोसले, रोहित परदेशी, डॉ. गीतांजली पवार, डॉ. सय्यद, ज्योती टाळके, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.