सामाजिक
देशस्तंभ चे उपसंपादकपदी सुरेश भिंगारदिवे तर दरेवाडी प्रतिनिधी म्हणून विनोद वर्मा यांची निवड!

अहमदनगर दि.२२मे(प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे यांची देश स्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्कचे उप संपादक पदी नियुक्ती करण्यात आली.तसेच दरेवादी गावातील सामजिक कार्यकर्ते विनोद वर्मा यांची दरेवाडी प्रतिनिधी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.यावेळी त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थापक संपादक महेश भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे,देविदास सरोदे,नलिनी सरोदे, जोती विनोद वर्मा, दिक्षा लुंगसे,आदी उपस्थित होते.यावेळी नूतन उप संपादक व प्रतिनिधींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.