सामाजिक

कर्जत पंचायत समितीमध्ये बार्टी संस्थेतर्फे अनुसूचित जाती जमाती कायद्याचे महत्त्व या विषयावर चर्चा

कर्जत (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यावतीने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत पंचायत समिती कर्जत येथे एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी अध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय चव्हाण सर तसेच प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव तहसीलदार कर्जत नानासाहेब आगळे साहेब गटविकास अधिकारी अमोल जाधव साहेब मा. भास्कर भैलुमे अनु.जमाती समिती तथा सेवक कर्जत अभिजीत ससाने जिल्हाध्यक्ष सा. न्या. वि.रा. काँ.पार्टी तसेच प्रमुख वक्ते एडवोकेट महेंद्र शिंदे (तज्ञ व्याख्याते) मा.आशिष बोरा सर (तज्ञ व्याख्याते) सामाजिक कार्यकर्ते हनुमंत अवचार (ग्रा.पं सदस्य वालवड) जिल्हाध्यक्ष मा. नितीन अवचर (national dalit movement for justice) हे सर्व मान्यवर उपस्थित होते*प्रथमतः आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आपल्या मनोगतात ॲट्रॉसिटी कायदा का वापरायचा व त्याचे फायदे हे जनतेसमोर मांडले तसेच गटविकास अधिकारी अमोल जाधव साहेब यांनी कायद्यातील तरतुदी व कायदा कोणाला लागू होतो यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मौल्यवान शब्दांची विश्लेषण केले तसेच प्रमुख वक्ते एडवोकेट महेंद्र शिंदे यांनी खैरलांजी प्रकरणाचे उदाहरण देऊन उपस्थित जनसमुदायाला कायद्याचे महत्त्व पटवून दिले तसेच तज्ञ व्याख्याते आशिष बोरा साहेब यांनी आपल्या मनोगतात आपली एकात्मता दाखवण्यासाठी विशेष उदाहरण देऊन युवकांना एकत्र येऊन आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल त्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत माहिती जनसामान्यांना सांगितली.
या कार्यक्रमाचे आयोजन समता दूध प्रकल्प जिल्हा अहमदनगर यांनी केले होते. तसेच बार्टी संस्थेच्या वतीने उपस्थिततांसाठी भोजनाची सोय केली होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे