ग्रंथोत्सवाद्वारे वाचकांना साहित्यिक मेजवानी:आमदार निलेश लंके

अहमदनगर-दि २१( प्रतिनिधी) ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने अहमदनगरच्या रसिक वाचकांसाठी ग्रंथोत्सवाद्वारे साहित्यिक मेजवानी दिली असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले त्यांनी पेमराज सारडा महाविद्यालयातील ग्रंथोत्सवास भेट दिली .त्यावेळी ते बोलत होते. सर्व स्टॉलला भेटी दिल्यानंतर तेथील रसिक वाचकांची उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त करून जिल्ह्यातील ग्रंथालयांना देखील चांगली दर्जेदार पुस्तके मिळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले .तसेच गावोगावी सार्वजनिक ग्रंथालय आवश्यक असल्याचे मतही मांडले यावेळी त्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले . त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वागत जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले यावेळी विजय डोळ, गोवर्धन कारले ,सादिक शेख, पोपट उगले ,गणेश कुलकर्णी आदींसह जिल्ह्यातून आलेले ग्रंथालय कार्यकर्ते उपस्थित होते.