गुन्हेगारी

दुचाकी चोरणारे दोघे भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद!

अहमदनगर (प्रतिनिधी)- दुचाकी चोरी करणा-या दोघांना भिंगार कॅम्प पोलीसांनी जेरबंद केले आहे. याबाबतची माहिती अशी की,
दिपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता.आष्टी, जि.बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय सुनिक काळे (रा. चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनी शिशिरकुमार देशमुख, पोना.विनोद गंगावणे, पोना.राहुल द्वारके, पोना.भानुदास खेडकर, चापोकाँ.अरूण मोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की,दि.१७ सप्टेंबर 2020 रोजी बबन फकीरा मोकाटे ( रा. इमामपुर पोस्ट जेऊर ता. नगर जि. अहमदनगर) यांनी 10 हजार रू किंमतीची दुचाकी सी टी डिलक्स ( युपी .32 .डीयु. 6122) निळ्या रंगाची ही चोरीस गेल्याबाबत भिंगार कॅम्प पो स्टे ला दि.१९ सप्टेंबर 2020 रोजी गुरनं २६१९/२०२० भादवि कलम ३७९प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.या गुन्ह्यातील गेला माल हा अंभोरा पोस्टे जि. बीड येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने सपोनी शिशिरकुमार देशमुख यांनी कॅम्प पोस्टेचे पोना.विनोद गंगावणे, पोना.राहुल द्वारके, पोना.भानुदास खेडकर, चापोकाँ.अरूण मोरे अशांना रवाना करून अंभोरा पोस्टे येथून दुचाकी ताब्यात घेऊन गुन्ह्यातील आरोपीची अधिक माहीती घेतली. गुन्हा हा दिपक दिलीप साके, राहुल छगन काळे, अक्षय सुनिक काळे यांनी केला असल्याचे समजल्यावरून भिंगार कॅम्प पोस्टेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी पथकाला आदेश देऊन आरोपींना ताब्यात घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. पथकाने लागलीच कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेतले पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे