प्रजासत्ताक दिनी अनाधिकृत गाळे हटवण्यासाठी तहसील कार्यालया समोर लोकशाही विचारमंच चे उपोषण.
शहर व ग्रामीण भागामध्ये उभारण्यात आलेले अनाधिकृत पत्र्याचे गाळे काढण्याची मागणी - सोमा शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये कुठलीही शासकीय परवानगी न घेता चौका-चौकांमध्ये पत्र्याचे शेड उभारून यामध्ये अनाधिकृतपणे गाळे तयार केले आहे. सदरचे गाळे हे अनधिकृत असून शासनाला कुठलाही प्रकारचा कर भरला जात नाही शासनाची मोठी फसवणूक हे गाळेधारक करत आहेत ग्रामीण भागातील तसेच शहरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पत्र्याचे गाळे त्वरित हटवा या मागणीसाठी तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनीच लोकशाही युवा मंचच्या वतीने अमरण उपोषण सुरु केले आहे या उपोषणामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, जिल्हाध्यक्ष संदीप यादव, महिला उपाध्यक्ष शैलाताई गायकवाड, आकाश खरपे, दिपक गायकवाड तसेच संघटनेचे पदाधिकारी या उपोषणा मध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये पत्र्याचे अनाधिकृतपणे गाळे थाटले आहे. या गाळेधारकांनी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर हा उद्योग केला आहे शासनाचा कुठलाही कर ते भरत नाही नुकत्याच तपवन रोड भागामध्ये अनाधिकृतपणे पत्र्याचे शेड उभारले होते या ठिकाणी आग लागली होती यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने कुठलीही जीवित हानी घडली नाही हे अनाधिकृत गाळे धोकादायक असतात तरी अहमदनगर शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ठिकाणी पत्र्याचे शेड मध्ये गाळे उभारलेलंयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून अमरण उपोषण करण्यात आले आहे.