सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलिस कर्मचारी व त्यांच्या सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलिस कर्मचारी व त्यांच्या पत्नी यांस सर्व आजारांवर हॉस्पिटलमध्ये आजीवन मोफत उपचार मिळावेत:नितीन खंडागळे
पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन

अहमदनगर दि.२० ( प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनवर कामाचा वाढता व्याप लक्षात घेता तसेच त्यांना मिळत असलेल्या अल्पवेतना मुळे त्यांना वैयक्तिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही,अनेक शारीरिक व्याधी व अनेक आजारांना पोलिस कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.यामुळे नौकरी करत असताना त्यांना शासकीय सुविधा आरोग्यसुविधा मिळतात परंतु सेवा निवृत्ती नंतर वैयक्तिक व कौटुंबिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते. वाढत्या महागाई मुळे औषधोपचारांचा व हाॕस्पीटल चा खर्च पेलवत नाही. त्यामुळे पोलीस बॉईज असोशियन च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलिस कर्मचारी व त्यांच्या पत्नी यास आजीवन सर्व आजारांवर मोफत औषधोपचार देण्यात यावे असे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. यावेळी अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर,खजिनदार संकेत पवार,सचिव सिध्दांत ससाणे,वसिम सर,विजय काळे, संतोष सासवडे,अजय आव्हाड,नंदकुमार साबळे,संतोष जाधव,किरण शिंदे,गणेश लष्कर,जोएल शिंदे,संजय लष्कर,संदिप काळे,किरण भापकर,सतिष मुंडलिक, संजय जाधव,आदी पदाधिकारी उपस्थित होते.