
मिरजगाव (वार्ताहर) : देशस्तंभ न्यूज नेटवर्क च्या मिरजगाव वार्ताहरपदी नव्यानेच नेमणूक केलेले पत्रकार संकेत घोडके यांचा मिरजगाव मधील रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष् महात्मा फुले चौक येथे सत्कार सोहळा करण्यात आला.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते संतोष कोरडे, भाजपा युवा नेते भाऊ जवादे, सचिन घोडके, संकेत राजेंद्र घोडके, नितीन जवणे, मयुर चव्हाण, सौरभ बारटक्के, आकाश पवार, तुषार कोरडे, निखील घोडके, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.