मंदिरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांनी केले अटक!

अहमदनगर दि. २६ जुलै (प्रतिनिधी) मंदिरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांनी केले अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
दिनांक २२/०७/२०२३ रोजी फिर्यादी संजय किसन खाकाळ वय ५० वर्ष धंदा- टेलर रा. शिंगवे नाईक ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, २१/०६/२०२३ रोजी रात्री ०९/०० ते दिनांक २२/०६/ २०२३ रोजी पहाटे ०४ / ३० वा चे दरम्यान दत्त मंदीर शिंगवे नाईक मंदीरातुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने २,२३,५००/- रु किमतीचे चांदीचे सिहांसन, चांदीची छत्री, चांदीचा मुकुट, पादुका अशा वस्तु चोरुन नेल्या आहेत. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सुनिल नरेंद्र यादव रा. हारापुरा ता. गोरखपुर जि पिपीगंज उत्तरप्रदेश याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला आहे. तो सध्या श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना श्रीरामपूर येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी श्रीरामपूर येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल नगेंद्र यादव वय २५ वर्ष रा. हारापुरा ता. गोरखपुर जि पिपीगंज उत्तरप्रदेश असे सांगीतले. सदर आरोपीकडुन एक चांदीची छत्री, एक चांदीचे ताट, एक जोड चांदीच्या पादुका, ३ चांदीचे मुकुट, सोन्याची कर्णफुले, सोन्याचे मणी, एक जोड चांदीचे पैजण असा सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीच्या साथीदारांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि २९/०७/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदरचा आरोपी हा सराईत असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. आरोपी सुनिल नगेंद्र यादव वय २५ वर्ष रा. हारापुरा ता. गोरखपुर जि पिपीगंज उत्तरप्रदेश याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ५४६ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे.
२) सारींना पोस्टे उत्तरप्रदेश रजि नंबर ३५ / २०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
३) हारापुर पोस्टे उत्तरप्रदेश गु रजि नंबर ०४/२०१६ भादवि कलम ४६७,४६८ प्रमाणे. ४) राहुरी पोलीस स्टेशन गु रजि. ६८५ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी संपराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई चांगदेव हंडाळ, पोसई योगेश चाहेर, पोना भागवत, पोकों किशोर जाधव, पोकों/ नवनाथ दहिफळे, पोकॉ/ गजानन गायकवाड, पोकों/सुरज देशमुख, यांचे पथकाने केली आहे.