चितळी शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न

पाथर्डी (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील चितळीत
शाळास्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा जि .प. प्राथमिक शाळा चितळी येथे केंद्रप्रमुख मेहताब लदाफ व मुख्याध्यापक राजाराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच सुवर्णाताई कदम यांच्या हस्ते झाले.त्या म्हणाल्या शासनाचा हा शाळापूर्व तयारीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यापूर्वी चांगली तयारी होणार आहे .
शिक्षक , अंगणवाडी ताई , स्वयंसेवक व पालक यांनी सर्वांनी मिळून हे अभियान कसे राबवायचे याबदद्ल महादेव कौसे यांनी सखोल मार्गदर्शन यांनी केले .
सर्व शिक्षक , अंगणवाडी ताई ,स्वयंसेवक , वेगवेगळ्या टोप्या घातलेले दाखलपात्र विद्यार्थी , त्यांचे पालक या सर्वांनी गाणी म्हणत , लोकजागृती करत गावातून फेरी काढली .
शालेय दालनात वेगवेगळ्या क्षमतांचे सात स्टॉल बनवले होते . दाखलपात्र विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली . सांगितल्याप्रमाणे कृती करत खेळ खेळत आनंद लुटला .
यावेळी स्वयंसेवक म्हणून ज्योती पवार , सिद्धार्थ ताठे , अभिजीत पवार , गोविंद पोटफोडे , विशाल भालेराव यांनी काम पाहिले . तर संगीता वाबळे , प्रतिभा पवार , शुभांगी कोठुळे , रोहिणी कदम , अर्चना कोठुळे , वैशाली ताठे यांची गटप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली .
प्रास्ताविक कैलास सदामत यांनी केले .आभार सोनाली ससाणे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुपमा जाधव , सविता राजपूत , मुक्ता देशमाने , अनिता आमटे , बेबी ताठे , उज्वला कदम , जिजाबाई कदम , मीना ताठे यांनी प्रयत्न केले .
यावेळी कविवर्य बाळासाहेब कोठुळे , संतोष कदम , दादासाहेब ढमाळ , अमोल वाणी आदी उपस्थित होते .