अहमदनगर दि. 3 एप्रिल (प्रतिनिधी )
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रणजीत जाधव व शिवाजी ढाकणे हे पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती घेत असताना पथकास इसम नामे कृष्णा सोनवणे पांढ-या रंगाचे ढंपरमधुन देसवडे ते पोखरी रोडने, पोखरी शिवार, ता. पारनेर येथुन वाळुचा उपसा करुन त्याचे विना नंबर डंपर मधुन चोरुन वाहतुक करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने दिनांक 02/04/24 रोजी पारनेर पो.स्टे.चे अंमलदारांना सोबत घेवुन पोखरी गावात वारणवाडी फाटा, ता. पारनेर येथे सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे 1 पांढरे रंगाचा ढंपर येताना दिसला. पथकाची खात्री होताच सदर ढंपर चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा करताच चालकाने ढंपर रस्त्याचे कडेला थांबविला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन सदर ढंपरची पहाणी करता ढंपरमध्ये शासकिय वाळु असल्याची खात्री झाल्याने चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) कृष्णा गिताराम सोनवणे वय 31, रा. वासूंदे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यास शासकीय वाळू वाहतूकीचा परवानाबाबत विचारपुस करता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी करुन वाहतुक केल्याने 10,00,000/- रुपये किंमतीचा 1 पांढरे रंगाचा ढंपर व 30,000/- रुपये किंमतीची 3 ब्रास वाळु असा एकुण 10,30,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 241/2024 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला साो.पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री.प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा.श्री.संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा