भूषणनगरमधील सॉफ्टवेअर इंजि. अमित गोरे यांना कॅलिफोर्नियातील आयटी कंपनीत नोकरीची संधी

अहमदनगर दि.१९ जानेवारी (प्रतिनिधी) – केडगावमधील भूषणनगरमधील रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनिअर अमित राजेंद्र गोरे यांनी आपले बीई कॉम्प्युटरचे शिक्षण जेएसपीएम कॉलेज (पुणे) व नंतर रोबोटक सायन्समध्ये पुणे येथेच शिक्षण पूर्ण केले. याच ठिकाणी नामांकित अशा इंन्टेलिस्वीफ्ट (intelliswift) या आयटी कंपनीत सीनिअर असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रूजू झाले. कंपनीत कार्यरत असताना गोरे यांची हुशार तल्लकबुद्धी, चाणाक्ष व हरहुन्नरी अशी कामाची पद्धत, तसेच आपल्या कामाशी एकनिष्ठ व उत्कृष्ट सेवा अधिकाऱ्यांच्या नजेरत भरली. या कामाची दखल घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याच कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित युनिटमध्ये प्रमोशन देत नोकरी करण्याची संधी देऊन एकप्रकारे कामाची पावती दिली. त्यांनीही तात्काळ होकार देत युनिटमध्ये सेवेसाठी हजर झाले आहेत.
प्रभागातील रहिवासी असलेल्या श्री. गोरे यांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल नगरसेवक विजय पठारे यांनी आई सुजाता गोरे, पत्नी अमृता गोरे, बहीण अश्विनी विधाते, महेश विधाते व रासकर परिवाराचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.