गुन्हेगारी
महिलेस मारहाण करत विनयभंग : दोघांविरुध्द गुन्हा दाखल जेऊर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)
पांढरीपूल परिसरात महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघा जणांविरुध्द सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांढरीपूल शिवारातील महेश कारभारी कर्डिले आणि योगेश कारभारी कर्डिले (दोघे रा.पांढरीपूल) हे एका महिलेच्या घरात घुसले व त्यांनी महिलेस दमदाटी करत लाथाबुक्कयांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरिक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र लभडे हे पुढील तपास करत आहेत.