महाराष्ट्र

व्यसनाधीनतेस प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही धोरणास जनआंदोलनाचा विरोध कायम :अण्णा हजारे

ग्रामसभेच्या आग्रहामुळे राळेगणसिद्धी येथे होणारे उपोषण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले स्थगित!

केडगाव (प्रतिनिधी :मनीषा लहारे) व्यसनाधीनतेस प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही धोरणास जनआंदोलनाचा विरोध कायम राहील. वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारात घेऊन करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिल्यामुळे कार्यकर्ते व ग्रामसभा यांच्या आग्रहानुसार १४ फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथे सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
राज्यातील किराणा दुकानांतून वाईन विक्रीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी १४ फेबुवारीपासून जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे सुरु होणाऱ्या उपोषणाचा इशारा देण्यात आला होता . उपोषणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला . महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवली तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची तयारी सुरू केली . विविध जैन संघटना , काही मुस्लिम संघटना यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला . नगर सहकारी ठिकाणी वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनी ही रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याचे जाहीर केले .
त्यानंतर सरकारने या मुद्द्यावर चर्चा सुरू केली . दि. १० , ११ व १२ तारखेला मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धी येथे केलेल्या चर्चेनंतर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सरकारने मान्य केले असून , अशा प्रकारचे नागरिकांच्या जीवनावर दुष्परिणाम करणारे धोरण ठरविताना ते जनतेला विचारूनच ठरवावे, असा आग्रह शासनाकडे धरण्यात आला . तो शासनाने मान्य केला आहे . तसे लेखी पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर , उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त , उपायुक्त , नगरचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी सुमारे अडीच तास सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करून दिले आहे .

बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली
– किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही .
– वाईन विक्रीचे नवीन धोरण जनतेला विचारूनच घेतले जाईल .
– वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणावर सूचना व हरकती मागविणार .
– सूचना व हरकती मागविण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी .
– सरकारकडून हरकती विचारात घेऊनच अंतिम निर्णय होईल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे