सामाजिक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी भीमसैनिक करणार लाक्षणिक उपोषण!
हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नगर शहरातील मार्केटयार्ड येथील जागेत करावा.या मागणीसाठी फुले,शाहू,आंबेडकरी विचारांना मानणारा समस्त आंबेडकरी समाज लढा देत आहे.याच पारश्वभूमीवर सर्व भीमसैनिक व भिम अनुयायी यांच्यावतीने,अहमदनगर शहरा मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विराट भिमशक्ति च दर्शन घडविण्याचे आवाहन शहर व जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.