राजकिय

तालुक्यातील ११ गावच्या पाणीयोजनांना प्रशासकीय मान्यता – राज्यमंत्री तनपुरे

राहुरी / प्रतिनिधी — राहुरी तालुक्यातील ११ गावांना पाणीपुरवठा योजना साठी ७ कोटी ८२ लाख ९१ हजार खर्चास जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे सात कोटी ८२ लाख ९१ हजार ६४७ रुपये खर्च येणार आहे यात राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा ३० लाख ५९ हजार पाचशे रुपये, केंदळ बुद्रुक ५३ लाख ४८ हजार ३३०, आरडगाव ७९ लाख ९५ हजार ८५६, कोंढवड ७२ लाख ३२ हजार, केंदळ खुर्द ६५ लाख ३७ हजार १७७, रामपूर ३० लाख २४ हजार ६७३, तांदुळनेर ९८ लाख ३२ हजार ५४०, वाघाचा आखाडा १ कोटी १७ लाख ४७ हजार, डिग्रस ५९ लाख ८९ हजार ९५४, चिंचाळे ९९ लाख ३५ हजार ३९४, मोमीन आखाडा ७८ लाख ८९ हजार ५५ असा खर्च गृहीत धरण्यात आला असून त्यासाठी ७ कोटी ८२ लाख ९१ हजार ६४७ रुपये खर्च येणार आहे जल जीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले राहुरी विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते वीज पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत रस्त्याच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे