राजकिय

विशेष लेख डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात – अल्पावधित लोकांना आपलसं वाटणारं महाराष्ट्रातील युवती नेतृत्व : किरण काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब हे कायम हसतमुख असणारे, शांत, संयमी नेते म्हणून महाराष्ट्राला मागील ४० वर्षांपासून परिचित आहेत. त्यांचे हेच गुण त्यांच्या कन्या जयश्री थोरात – जैन यांच्यामध्ये देखील उतरले आहेत. नुकतीच जयश्रीताई यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी निवड झाली आणि त्या पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर सक्रिय झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि आ.थोरात साहेब समर्थकांना, चाहत्यांना पाहायला मिळाल्या. मागील काही वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या जयश्रीताई आता काँग्रेसच्याही व्यासपीठावर सक्रिय झाल्या आहेत. अल्पावधीतच त्यांनी कार्यकर्त्यांना, लोकांना आपलसं केल आहे. त्यांची मनं जिंकली आहेत. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीतील जयश्री बाळासाहेब थोरात हे नाव निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावणारं असणार आहे यात कोणती शंका नाही.

जयश्रीताई या पेशाने डॉक्टर आहेत. कॅन्सर तज्ञ आहेत. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियलमध्ये सुरुवातीपासूनच काम केले आहे. कॅन्सर पेशंट्स साठी त्या काम करतात. अशा पेशंट्सची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत कमी झालेली असते. अशा ठिकाणी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. धोका असतो.. तेथे डॉ. जयश्रीताई आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांचे हे काम अविरतपणे सुरू होते हे विशेष. आता त्या या आपल्या वैद्यकीय कामाबरोबरच एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, महिला, युवक, शेतकरी यांच्यामध्ये देखील रमताना दिसत आहेत.

माजी मंत्री आ. थोरात साहेब हे तसे अत्यंत सुस्वाभावी, शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. अगदी हेच गुण त्यांच्या कन्या असणाऱ्या डॉ.जयश्रीताई यांच्या देखिल उतरले आहेत. राजकारणात काम करत असताना या गुणांचा उपयोग लोकांना समजून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच खूप उपयोगी पडतो. पक्षाच्या संघटनात्मक कामानिमित्त संगमनेर येथे नुकतीच आ.थोरात साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली. हा माझा तसा नित्यक्रम आहे. यावेळी डॉ. जयश्रीताई यांची देखील भेट घेतली. साहेबांचे निवासस्थान असणाऱ्या सुदर्शन बंगल्यावर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी नागरिकांची विविध प्रश्न घेऊन सकाळीच जमली होती. यावेळी साहेबांना भेटणारे लोक डॉ. जयश्रीताई यांनाही भेटत होते. यावेळी प्रश्न मांडत असणाऱ्या लोकांशी संवाद साधताना डॉ. जयश्रीताई त्यांच्या कामाची पद्धत जवळून अनुभवता आली. मग लक्षात आले की आदरणीय साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत जयश्रीताई देखील एवढ्या कमी वेळात लोकांना हव्याहव्याशा का वाटू लागल्या आहेत. राज्यात सत्तापालट झाले असले तरी देखील काँग्रेस ऑल इंडिया वर्किंग कमिटीचे सदस्य, राज्यातील अत्यंत ज्येष्ठ नेते, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून आजही राज्य पातळीवरती थोरात साहेब खूप व्यस्त असतात. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यक्रमांना थोरात साहेबांच्या वतीने त्या जातीने उपस्थित असतात. त्यामुळे त्यांचा कमी कालावधीत मोठा, दांडगा जनसंपर्क तयार झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अनेक नेत्यांची मुलं त्यांच्या पुढच्या पिढीची धुरा सांभाळताना निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. मात्र मुलींची संख्या यामध्ये नक्कीच कमी आहे. शरद पवार यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे असे काही मोठे अपवाद निश्चित आहेत. मात्र माजी मंत्री आ.थोरात साहेबांच्या कन्या डॉ. जयश्रीताई यांच्यात देखील उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक सक्षम युवती नेत्या म्हणून काम करण्याची धमक निश्चितपणे या निमित्ताने पाहायला मिळत आहे. ही आ.थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद देणारी व उत्साह वाढवणारी बाब आहे.

डॉ.जयश्रीताई या सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. युवा पिढी त्यांना मोठ्या संख्येने समाज माध्यमांवर फॉलो करते. महिला बचत गट, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य या विषयावर त्यांचे विशेष काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःची अशी वेगळी भाषण शैली विकसित केली आहे. त्या जेव्हा भाषणासाठी उभ्या राहतात त्यावेळी केवळ भाषण न करता उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधतात. उपस्थितांची मने जिंकतात. नुकत्याच त्या एका वेळग्या भूमिकेतही पाहायला मिळाल्या. राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आ. यशोमती ठाकूर यांची त्यांनी घेतलेली मुलाखत अनेकांनी पसंत केले.

थोरात घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत जुनं आणि मोठं नावाजलेले घराणं म्हणून ओळखल जात. स्वभाविकच राजकारण्यांची मुलं म्हटलं की मोठा बडदास्तपणा, तामझाम, बोलण्यातला उर्मटपणा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात सांगता येतील. हे तथाकथित युवराज कार्यकर्त्यांना सहजासहजी भेटतही नाहीत. किंबहुना कार्यकर्त्यांचा साधा फोनही उचलत नाहीत. अशी तक्रार कार्यकर्ते करत असतात. मात्र डॉ. जयश्रीताई याच्या एकदम विरुद्ध आहेत. कुणाला त्यांच्याशी थेट जाऊन दडपण अथवा भीती न वाटता बोलावंस वाटावं अशी साधी सरळ देहबोली, कायम असणारा हसमुख चेहरा, बोलण्यातील अर्जवता आणि आपलेपणा, समोरच्याच ऐकून घ्यायची तयारी, संयम, कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असणं, फोनवरही कार्यकर्त्यांचे, लोकांचे प्रश्न सोडवणे, आपले वडील फार मोठे नेते आहेत वगैरे वगैरे ही हवा डोक्यात तसू भर ही घुसू न देता पाय जमिनीवर ठेवून वागणं, यामुळेच त्या अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रत्येकाला जवळच्या वाटू लागल्या आहेत. हीच त्यांच्या भविष्यातील महाराष्ट्राच्या पटलावर राजकीयदृष्ट्या मोठी जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम असल्या बाबतची काँग्रेस पक्षावर आणि आ. थोरात साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढणारी बाब आहे.

थोरात साहेबांचा जनसंपर्क हा केवळ अहमदनगर जिल्ह्या पुरता सिमित नसून तो सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, नेते महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघांमध्ये आहेत. जे प्रेम कार्यकर्त्यांनी भरभरून आ. थोरात साहेब यांना दिले, तेच प्रेम कार्यकर्ते डॉ.जयश्रीताई यांना देखील केवळ थोरात साहेबांची मुलगी आहे म्हणून नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या गुणांमुळे नक्कीच देतील. जयश्रीताई यांच्यात असणारे गुण हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील उद्याच्या सक्षम युवती, महिला नेत्याला आवश्यक असणारे आहेत. केवळ एका मोठ्या वडिलांची मुलगी म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहत नसून डॉक्टर असणाऱ्या आणि स्वतःच असं वेगळं व्हिजन असणाऱ्या कर्तृत्ववान डॉक्टर आणि सामाजिक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहत आहेत.

*मी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी त्यांना काँग्रेस पक्षाचा आणि आदरणीय थोरात साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अनंत शुभेच्छा देतो.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे