प्रशासकिय

दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा- राधाकिसन देवढे

दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा- राधाकिसन देवढे

अहमदनगर, दि.22 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी महाशरद पोर्टल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या https//mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यासाठी दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, महाशरद (System for Health and Rehabilitation Assistance of Divyangs-SHARAD) https//mahasharad.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे देणगीदार, अशासकीय सामाजिक संघटना व समाजसेवक हे नि:शुल्क नोंदणी करू शकतात. आवश्यक साहित्य मिळणेबाबत नोंदणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना श्रवणयंत्र, व्हिलचेअर, कृत्रिम अवयव, जयपूर फुट, तीनचाकी सायकल, अंध काठी, कुबड्या, ब्रेल किट आदी साहित्यांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध होणार आहे. हे पोर्टल दिव्यांग व्यक्तींना मदत मिळणेसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना जोडणारा महत्वाचा दुवा असून एकाच छताखाली या सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होण्यासाठी व समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी महाशरद पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे