सध्या हुकूमशाही व हिटलरशाही पद्धतीने कारभार सुरू आमदार लंकेंनी आपल्या भाषणातून विरोधकांच्या दाव्याची केली पोलखोल टाकळी ढोकेश्वर गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पारनेर(प्रतिनिधी) :
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील वासुंदे ते खडकवाडी रस्ता सुधारणा करणे मार्गाचा अधिकृत उदघाटन समारंभ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक प्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून हा रस्त्याबाबत याविषयी अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या होत्या. रुग्णवाहिका वाहतूक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतमाल वाहतूक समाजातील प्रत्येक घटकाला फटका बसत होता. आता समस्या मिटत असुन या कामासाठी एकूण ७ कोटी रु.निधी मंजूर झाला आहे व रस्त्याचे काम दर्जेदार होईल आणि याठिकाणी देवाण-घेवाण करण्याऱ्या नागरिकांना फायदा होईल.तसेच टाकळी ढोकेश्वर येथील ढोकी याठिकाणी पण जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा उदघाटन व टाकळी ढोकेश्वर गावातील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळा टाकळी ढोकेश्वर येथे सांस्कृतिक भवन बांधणे कामाचा शुभारंभ, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे व व्यायाम शाळा दुरुस्ती अशा विविध २ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा समारंभ यावेळी आमदार लंके यांच्या हस्ते पार पडला. यापुढेही पारनेर तालुक्याच्या विकासाच्या कामांसंबंधी कटिबद्ध राहू असा शब्द या निमित्ताने आमदार निलेश लंके यांनी दिला.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की तालुक्याच्या उत्तर भागातील अतिशय महत्त्वपूर्ण असलेला वासुंदे ते खडकवाडी रस्त्याचे काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मंजूर झाले आहे. प्रत्यक्ष या कामाला आता सुरुवात झाली आहे. परंतु विरोधकांकडून या कामाच्या संदर्भात श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तालुक्यात अनेक कामे मी मंजूर करून घेतले आहेत ते टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत.
तालुक्यात आज जलजीवन मिशन च्या माध्यमातून अनेक गावांच्या योजना मंजूर झाल्या आहेत परंतु विरोधकांनी जो आरोप सुरू केला आहे तो चुकीचा आहे. जलजीवन मिशनच्या संदर्भात मीच राज्य शासन व केंद्र शासनाकडे महाविकास आघाडी सरकार असताना पाठपुरावा केला होता हे आम्ही पुराव्यानिशी आमच्याकडे उपलब्ध आहे. सध्या तालुक्यात व जिल्ह्यात सत्तेचा गैरवापर सुरू असून हुकूमशाही व हिटलरशाही पद्धतीने काम केले जात आहे. येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करायची वेळ आली तरी आम्ही सक्षम आहोत. तसेच पुढे बोलताना आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की टीका टिप्पणीशी राजकीय व वैचारिक असावी.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अशोकराव घुले, निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, वनकुटे गावचे सरपंच निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव राहुल झावरे, कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्षा शालिनी घुले, कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र चौधरी, नगर अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया, निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सर, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, मांडवे खुर्द गावचे सरपंच सोमनाथ आहेर, कातळवेढा गावचे सरपंच पियुष गाजरे, वासुंदे गावचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, ज्येष्ठ नेते भागुजीदादा झावरे, महादू भालेकर, वासुंदे सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणाताई खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, अभय नांगरे, कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त चंद्रभान ठुबे, सावरगाव उपसरपंच प्रदीप गुगळे, महेश झावरे, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे, रविंद्र गायखे, युवा नेते अमोल उगले, रावसाहेब बर्वे, बबनराव गांगड आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व्हा चेअरमन टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
******
मनामनात माणुसकी जपा : राजेंद्र चौधरी
आमदार निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून पारनेर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे जोरदार सुरू आहेत परंतु विरोधकांना ते देखवत नाही त्यामुळे टीकाटिप्पणी ते करत आहेत. कोरोना काळात आमदार लंके यांनी केलेले काम हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे प्रत्येकाने मनामनात माणुसकी जपावी व आमदार निलेश लंके यांना आदर्श ठेवून काम करावे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका आपली ही राजकीय वैचारिक लढाई सुरू असून आपल्या कामातून आपण सर्वजण समोरच्यांना आपला दर्जा दाखवून देऊ असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
******
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर सारख्या ठिकाणी अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत या पुढील काळातही आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे भविष्यकाळात जास्तीत जास्त निधी गावासाठी आणून प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी आपल्या भाषणात म्हणाले…