ताजनापूर लिफ्ट टप्पा १ व २ या योजनेमध्येआंतरवाली-खु ,आंतवाली- बु, मंगरूळ-खु, मंगरूळ-बु, बेलगाव, कोळगाव व भगूर या गावातील बंधाऱ्याचा,पाझर तलावाचा,गाव तलावाचा समावेश करावा- जि.प सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी केली मागणी

अहमदनगर दि.२८ औरंगाबाद रोड जलसिंचन भवन येथे जनशक्ती विकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वामध्ये ताजनापूर लिफ्ट टप्पा १ व २ या योजनेमध्ये आंतरवाली-खु ,आंतरवाली- बु, मंगरूळ-खु, मंगरूळ-बु, बेलगाव, कोळगाव व भगूर या गावातील बंधाऱ्याचा,पाझर तलावाचा,गाव तलावाचा समावेश करण्यासाठी जलसिंचन भवन,नगर येथे जि.प सदस्या सौ.हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता जगदीश पाटील साहेब यांना आज निवेदन देण्यात आले. यापूर्वीही
यासाठी ०९ऑगस्ट रोजी संघटनेच्या वतीने याबाबत निवेदन दिलेले होते, ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र-१ चे सर्वेक्षण सुरु होणार आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा नं -२ मधील शिल्लक असलेले पाणी आंतरवाली-खु, आंतरवाली-बु, मंगरूळ-खु, मंगरूळ-बु, बेलगाव, कोळगाव व भगूर या गावातील बंधारे, पाझर तलाव, साठवण बंधारे, सिमेंट बंधारे व इतर छोटे-मोठे बंधारे भरण्यासाठी या पाण्याचा वापर केल्यास या दुष्काळी असलेल्या सात गावांना शिल्लक पाण्याचा लाभ मिळू शकेल. या सातही गावांना भविष्यात कधीही पाणी मिळण्याची शक्यता नाही. ही गावे जिरायत असून दुष्काळी पट्ट्यातील आहेत.या गावात नेहमी पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असतो.या सर्व गावचे याबाबत नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये या गावांना पाणी मिळावे असे त्या-त्या गावचे ठराव गावातील शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत.यावेळी संजय काकडे ,विक्रम काकडे,अंबादास सांगळे,रामकिसन सांगळे,जालिंदर कापसे,सुभाष झिरपे, आदिनाथ झिरपे,प्रदीप झिरपे,महेश झिरपे,बंडू लोहकरे,पांडुरंग जाधव,मोतीराम लोहकरे,सोना झिरपे,रामभाऊ बिटाळ, मधुकर काकडे, किसन झिरपे यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.सौ.काकडे या वेळी म्हणाल्या की,या गावांनी असाच एकी ठेऊन पाठपुरावा केला तर आपले हे पाण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल,आणि आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही.