अहिल्यानगर दि. 13 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) प्रभाग क्र.11 मधील सारसनगर परिसरातून नगर विकास यात्रा काढण्यात आली.
यावेळी घराघरातून आ. जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. आ. जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या व ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला.यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक अविनाश तात्या घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा