ब्रेकिंगसामाजिक

भिमसैनिक नितीन शिरसाठ खून प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई करा पोलीस प्रशासनाला दिला,दहा दिवसाचा अल्टीमेटम समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दिनांक 13 मार्च : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील भीमसैनिक नितीन शिरसाठ याची 12 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

एक महिना उलटूनही नितीन शिरसाठ खून प्रकरणातील आरोपी फरार आहेत.

याबाबत समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात घोडेगाव येथील भीमसैनिक नितीन शिरसाठ याची 12 /2/ 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील घोडेश्वरी हॉस्पिटलमध्ये गोळ्या झाडून निघृणपणे हत्या करण्यात आली. यावेळी अनेक लोक उपस्थित होते पण कोणाचीही पर्वा न करता फुलमाळी टोळीने बाजाराच्या पावतीच्या टेंडर वरून नितीन शिरसाठ याची हत्या केली. सदर फुलमाळी टोळीची नेवासा तालुक्यात प्रचंड दहशत आहे ही टोळी दहशत माजवणे जमीन बळकावणे अवैध धंदे करणे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अग्निशस्त्र घेऊन फिरणे अशा पद्धतीची कृत्य वारंवार करीत असते त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर घटना घडून एक महिना उलटूनही फुलमाळी टोळीतील आरोपी स्थानिक पोलिसांना सापडत नाहीत ही बाब मोठी खेदाची आहे. खून आणि ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी गुलाब फुलमाळी सुरज फुलमाळी आकाश फुलमाळी कृष्णा फुलमाळी भरत फुलमाळी व इतर तीन जणांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच सोनई पोलीस स्टेशनचे अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व सोनई पोलीस स्टेशनला एक सक्षम अधिकारी नेमावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकरणी आठ दिवसाचे आत कारवाई न झाल्यास समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सुशांत म्हस्के, सुजित घंगाळे नाथाभाऊ आल्हाट,प्रतीक बारसे,संजय कांबळे, विवेक भिंगारदिवे,रोहित आव्हाड,अविनाश भोसले, संपदा ताई म्हस्के,ज्योतीताई पवार, विजय शिरसाठ, स्वप्निल साठे, निलेश शिरसाठ, सुरज शिरसाठ, अचानक आंग्रे,राहुल कुऱ्हाडे, प्रतीक शिरसाठ, मयूर ठुबे,अमोल लोंढे,अमोल लोंढे, सुयश लोंढे, सुहास जाधव,संतोष शेरे, विक्रम आंग्रे, लाला आल्हाट, किशोर लोंढे,प्रदीप ठोंबरे, प्रशांत लोंढे, जीवन पहिलवास, अमोल कुऱ्हाडे, जॉनभाऊपाटोळे, आंग्रे तात्या, शिरसाठ, सागर भाऊ पाटोळे , अविनाश आल्हाट, सिमोन भाकरे, विकास सरोदे, यश, सरोदे , रवींद्र साळवे,शेखर पंचमुख, अरुण शिंदे, रवी साळवे, आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे