“या “तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव मंजूर

जामखेड दि.10 नोव्हेंबर (प्रतिनिधी :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 42 शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रास्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री . बाळासाहेब धनवे यांनी दिली .
गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून ज्या शिक्षकांची सेवा सलग १२ वर्षे पूर्ण झाली आहे.अशा शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक जादा वेतनवाढ मंजूर केली जाते . शिक्षकांची व शिक्षक संघटनांची गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी पूर्ण झाली आहे.
मा. गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वरिष्ठ श्रेणीचे प्रास्ताव मंजूर करण्यात आले . ऐण दिवाळीत प्रास्ताव मंजूर करण्यात आल्याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे .
याकामी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री. गांगर्डे, श्री. नरवणे , श्रीम. ससाणे, तर गटविकास अधिकारी अधिकारी कार्यालयातील श्री . मुंडे, श्री . चौसाळकर यांनी चांगले कष्ट घेतले .