“बीजेपी आणि एनडीए चा आहे नारा! २०२४ मध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे वाजविणार बारा”:केंद्रीय मंत्री रामदास आठवले

अहमदनगर दि.१२ मार्च (प्रतिनिधी) आपल्या खुमासदार शैलीत नेहमी ओळखले जाणारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.”बीजेपी आणि एनडीए चा आहे नारा! २०२४ मध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे वाजविणार बारा”अशी चारोळी करत ते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांच्या समवेत विजयराव वाकचौरे,जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे,भीमराव बागुल,
राजाभाऊ कापसे, उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे,मराठा आघाडीचे सिधार्थ सिसोदे, भिंगारचे ज्येष्ठ नेते नाथा, भिंगारदिवे, विजयराव भांबल,अमित काळे,किरण दाभाडे,विलास साठे, विनोद भिंगारदिवे,रवि आरोळे,विशाल कांबळे, विशाल भिंगारदिवे,आरती बडेकर,आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना आठवले म्हणाले,बीजेपी सरकारवर कोणतेही भ्ष्टाचाराचे आरोप नाहीत.सर्व मंत्री अत्यंत चांगला कारभार करत आहेत.नवाब मलिक आमचे चांगले मित्र आहेत.पण जमीन खरेदीमध्ये गडबड झाल्याने त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.उद्धव ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही असा आरोप देखील त्यांनी केला.जिल्ह्यात दोन दिवसापासून काही ठिकाणी पाऊस पडत आहे.याबाबत सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली.जनधन योजनेमुळे देशात ४२ कोटी लोकांचे बँकेत खाते उघडले असून ३० कोटी लोकांना मुद्रा योजनेचा फायदा झाला आहे.तीन तलाखाचा कायदा मोदी सरकारने रद्द केल्यामुळे मुस्लिम समाजात सरकारच्या बाजूने चांगले वातावरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.बीजेपी जातीयवादी पार्टी आहे हा आरोप बिनबुडाचा असल्याचे ते बोलले राष्ट्रपती राजवटीची चर्चा निष्फळ असल्याने राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा विषयच नाही.लाँग लिव्ह राजकारण करायचे असेल तर शिवसेनेनी बीजेपी सोबत यावे असे आवानही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केले. आरपीआय ऐक्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले नेत्यांचे ऐक्य होणे अशक्य आहे.पण माझी भूमिका जनतेचे ऐक्य करण्याची आहे.वंचित बहुजन आघाडी पेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आरपीआय पक्षात येऊन नेतृत्व करावे.अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.सावेडी येथील सामाजिक न्याय भवनाची इमारती तयार आहे.तेथील रस्त्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून लवकरच प्रश्न मार्गी लावण्यास कळविणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना सांगितले.