कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईत पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला! मुख्यमंत्री शिंदेनी घेतली जिल्हाधिकारी आरोग्य यंत्रनेची बैठक! आढावा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन!

मुंबई : कोरोना (Corona) आता जीवघेणा ठरू लागला आहे, कोरोनाने पुन्हा एकदा देशात थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वच सक्रिय झाले आहेत. कोरोना JN.1 (Corona JN.1) च्या नवीन प्रकाराचा मागोवा घेणे देखील तीव्र केले जात आहे.
दरम्यान, समजा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असतील तर त्यांनी तातडीने तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे. कोरोनाचे रुग्ण (Corona patients in Maharashtra) वाढत असल्याने राज्यात आता टास्क फोर्सची स्थापना केली जाणार आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या 2,669 इतकी झाली आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरात कोरोनाचे रुग्ण 2 सापडले आहे.
मुंबई शहरात मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेला प्रशासन चालना दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.