नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून उर्दू शाळेसमोरील अंतर्गत रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण केडगावसाठी भरघोस निधी मंजुरीमुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांचा प्रश्न सुटणार – महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर दि.२४ मार्च (प्रतिनिधी) – केडगावमध्ये वसाहती दिवसागणिक वाढत असून, केडगाव उपनगरात आता खऱ्या अर्थाने नियोजित विकासकामे होणे आवश्यक आहे. शिवसेना नगरसेवक नव्याने तयार होणाऱ्या वसाहती व तेथील समस्या जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चारही नगरसेवक विविध विकासकामे सुचवतात. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकासकामे झाली असून, काही कामे सुरू आहेत व काही प्रस्तावित आहेत. अंतर्गत व मुख्य रस्ते हा येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय. हा विषय मार्गी लागावा, ही त्यांची मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी सतत प्रयत्नशील होते. माझ्याकडे वारंवार निधीसाठी पाठपुरावा करीत होते. शासनाचा निधी उपलब्ध होताच केडगाव रस्त्यांसाठी आता भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे आता केडगावच्या बऱ्याचशा समस्या व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केली.
उर्दू शाळेसमोरील रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, युवासेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक विजय पठारे, बबलू शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत चेमटे, अविनाश मेहेर, संतोष डमाळे, तारमोहम्मद शेख, मच्छिंद्र हुगले, भाऊसाहेब कदम, अल्लाउद्दीन सय्यद, अनिल पोटघन, संतोष बबन कांबळे, जमील शकील पटेल, आशा गावखरे, सलमा शेख, वाल्हाबाई धोत्रे, चितळकर, अकोलकर, संगीता आगे, कविता साबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग 16च्या नगरसेविका श्रीमती सुनिता कोतकर म्हणाल्या की, अंतर्गत मुख्य रस्त्यांच्या कामाची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती. केडगावकर यांचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न होता. महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी तो आता मार्गी लावला आहे. त्यांच्यामुळेच केडगावला विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. आता विकासकामे झपाट्याने होतील. असेच त्यांचे भविष्यात आम्हा केडगावकरांना सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांची भाषणे झाली.