ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची बदनामी करणाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध घाला~शरद पवळे

पारनेर दि.२० मे (प्रतिनिधी)ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून चाललेली बदनामी ही समाजहितासाठी घातक असून याला वेळीच पोलिसांनी आवर घातला पाहिजे,भ्रष्टाचाराची लढाई ही भ्रष्ट आचार विचारावर अवलंबून आहे आज प्रत्येक शासकीय कामात काही अंशी भ्रष्टाचार होतोय त्यासाठी प्रशासकीय कार्यामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे,ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी भ्रष्टाचार मुक्तीचे कार्य आपले आचार-विचार सांभाळून चारित्र्यशील समाज निर्माण साठी अविरत योगदान दिले आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी आपले अनमोल जीवन वैयक्तिक सुखाचा त्याग करत समाजकार्यासाठी वाहून देशासमोर नव्या पिढीसमोर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून न्याय कसा मिळवायचा हे उभ्या देशाने नव्हे तर जगाने पाहिले आहे आज अनेक चळवळीतील कार्यकर्ते संस्था गाव लोकप्रतिनिधी अण्णा हजारेंकडून मार्गदर्शन घेऊन समाजहिताची कामे करताना आपण पाहत आहोत. ऋषितुल्य अण्णा हजारेंनी देशाला माहितीचा अधिकार दप्तर दिरंगाई , ग्रामसभेला अधिकार, लोकपाल लोकायुक्त यांसारखे सक्षम कायदे सरकारला करायला भाग पाडले त्याचबरोबर आदर्श गाव,वृक्षारोपण वृक्षसंवर्धन,दारूबंदी अशा अनेक विविध विषयांवर अण्णांनी काम करून देशांमध्ये त्यांची दुसरे गांधी म्हणून ओळख निर्माण झाली आहे अण्णांसोबत अनेक कार्यकर्ते आले अनेक जण सत्ता पैसा प्रतिष्ठान आदी प्रलोभनांना बळी पडले यासाठी अण्णांनी चारित्र्यशील कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम सुरू केले आज अण्णा हजारे यांनी उभ्या केलेल्या कार्यामुळे पक्षविरहित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळत आहे तरी अण्णांच्या अण्णांच्या वयाचा विचार करत त्यांचे योगदान त्यांची उंची टीका करणाऱ्यांनी तपासावीआज सोशल मीडियामध्ये कृती शून्य,प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणाऱ्यांकडून अण्णा हजारे यांची जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्याचे काम राजरोसपणे सुरू आहे अशा अपप्रवृत्तींच्या सोशल मीडियावर पोलिसांनी निर्बंध आणावेत व हेतूपुरस्कृत बदनामी करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करावी, पोलिसांनी वेळीच कार्यवाही न केल्यास लवकरच पुढची दिशा ठरवू असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.