स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध गावठी हातभट्टी व ताडीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! एक लाख अठ्ठयाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

अहमदनगर (प्रतिनिधी) ३१ ऑक्टोबर:-स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध गावठी हातभट्टी व ताडी उद्धवस्त करत एक लाख अठ्ठयाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,
नगर तालुका व शेवगांव पो.स्टे.हद्यीत अवैध गावठी हातभट्टी व ताडी ठिकाणी छापे टाकुन ०७ आरोपीविरुध्द कारवाई करुन १,७८,०००/- रुपये एक लाख अठ्ठयाहत्तर हजार रुपये) किमतीचे अवैध गावठी हातभट्टीची साधने व २६०० लि. कच्चे रसायन तसेच २८५ लि. तयार दारु, व १८० लि. ताडीचा साठा नाश स्थानिक गुन्हे शाखा यांनी कारवाई केली आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/ बबन मखरे,पोना/शंकर चौधरी,संदीप दरंदले,ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे,पोकॉ/शिवाजी ढाकणे,आकाश काळे, चापोहेकॉ/पालवे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका व शेवगांव पोलीस ठाणे हद्यीमध्ये रविवार दि.३०/१०/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०६ ठिकाणी छापे टाकून एकुण १,७८,०००/- रुपये किमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन,गावठी हातभट्टीची दारु व ताडी जप्त करुन ०७ आरोपींविरुध्द नगर तालुका ०४ व शेवगांव पोलीस ठाण्यात ०२ असे एकुण महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ०६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.१,७८,०००/- रु. कि.ची २६०० कच्चे रसायन, २८५ लि. गावठी हातभट्टीची तयार दारु नाशिक केली आहे.संदरची कारवाई मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक, श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर मा.श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अतिरीक्त कार्यभार शेवगांव विभाग,शेवगांव,श्री.अजित पाटील े उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.