कठोर मेहनत, कलेवर प्रेम व देशाभिमान हीच यशाची गुरुकिल्ली : उद्धव शिंदे बालचित्रकार कीर्ती आव्हाड हिचा स्नेहबंध फौंडेशन तर्फे सत्कार

अहमदनगर दि. ४ जानेवारी (प्रतिनिधी) – जीवनात कलाकार म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कठोर मेहनतिची तयारी, कलेवर नितांत प्रेम आणि आपल्या देशाविषयीचा अभिमान या तीन गोष्टी कोणत्याही कलाकाराला यशाच्या शिखरावर पोहोचवते, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
अहमदनगर छावणी परिषद शाळेची विद्यार्थिनी कीर्ती सोमेश्वर आव्हाड हिने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय बालचित्रकार स्पर्धा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा स्नेहबंध फौंडेशनतर्फे सन्मानपत्र व पदक देऊन अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मान केला. यावेळी छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसेल डिसूजा, मेलिसा डिसूजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, मनोनित सदस्य वसंत राठोड, मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, स्नेहा पारनाईक, विनय महाजन, कैलास मोहिते, रोहित परदेशी आदी उपस्थित होते.