चांदेखुर्द-खुरंगेवाडी सोसायटीवर श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व, रामदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता-परिवर्तन

चांदेखुर्द-खुरंगेवाडी सोसायटीवर श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व, रामदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता-परिवर्तन
कर्जत (प्रतिनिधी) : दि २१
कर्जत तालुक्यातील चांदेखुर्द-खुरंगेवाडी सेवा सोसायटीवर रामदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत विरोधकांचा सुपडासाफ केला. १३-० असे यश मिळवत सत्ता परिवर्तन घडविले.
चांदे खुर्द – खुरंगेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ पैकी १३ जागा जिंकून श्री जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. रामदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पॅनलला धूळ चारीत १३ जागा मिळवत धुव्वा उडविला. निकालानंतर ग्रामदैवत श्री हनुमान मंदीरात विजयाची सभा घेण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देताना रामदास सूर्यवंशी यांनी सभासदांना दिलेले शब्द पूर्ण करणार असल्याचे सांगत मतदारांचे आभार मानले. विजयासाठी पॅनल प्रमुख प्रल्हाद सूर्यवंशी, बाबा वायसे, दत्तात्रय भोसले, राजुद्दीन सय्यद, भाऊसाहेब शिंगाडे, ब्रहस्पती सूर्यवंशी, सुखदेव गावडे, बबन सूर्यवशी, आजीनाथ सूर्यवंशी, यशवंत पवार, गौतम सूर्यवंशी, महेद्र सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी, कुंडलीक सूर्यवंशी,विनायक भोसले ,विनोद गंगावणे, हनुमंत गावडे, लक्ष्मण सूर्यवंशी , संतोष खुरंगे, दादा वायसे, बापू खुरंगे, सखाराम खुरगे आदीसह सर्व सभासद व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचा सन्मान केला.
**** सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : शत्रुघ्न जालींदर सूर्यवंशी, अमोल मारूती सूर्यवंशी, केशव शामराव सूर्यवंशी, सर्जेराव साहेबा बळे, संजय बाबू भरणे, राजू पोपट जगधने, भागुजी दगडू पवार, रामदास नामदेव पवार, बिस्मिल्ला बाबूलाल सय्यद, शशीकला जालींदर सूर्यवंशी, तात्या बापू वायसे, उमेश श्रीरंग गंगावणे आणि सुनिल आशाराम सूर्यवंशी यांना निवडणूक निर्णय अधिकारी डी एस साळवे यांनी विजयी घोषित केले.