प्रशासकिय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दिल्लीकडे प्रस्थान

शिर्डी, दि. ७ जूलै (प्रतिनिधी) – श्री साईबाबा समाधी दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी येथे आज आगमन झाले होते. श्री साईबाबांच्या समाधी दर्शन घेतल्यानंतर भारतीय वायू सेनेच्या विशेष विमानाने त्यांनी दिल्लीकडे प्रस्थान केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शिर्डी विमानतळावर निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.