गुन्हेगारी
भिंगार पोलिसांनी टाकला बिंगो जुगारावर छापा!१,३५,४०५ रू.मुद्देमाल केला जप्त!

अहमदनगर दि.११ डिसेंबर (प्रतिनिधी)भिंगार पोलिसांनी टाकला बिंगो जुगारावर छापा!१,३५,४०५ रू.मुद्देमाल केला जप्त केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत गवळीवाडा पाण्याच्या टाकीजवळ दोन ठिकाणी व नगर पाथर्डी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ अशा एकूण तीन ठिकाणी बिंगो नावाचा जुगार चालू असताना भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण १,३५,४०५ रू.मुद्देमाल जप्त करून एकूण सात जणांविरुद्ध महाजु.का.क.१२ अ प्रमाणे पोना/भानुदास गौतम खेडकर व पोना/राहुल तात्यासाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.