पद्मभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदे खुर्द येथे भव्य मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर

चांदे खुर्द (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथे पद्मभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदे खुर्द येथे भव्य मधुमेह आणि रक्तदाब
तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार रोहित दादा पवार यांच्या मोफत शिबिरांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदे खुर्द या ठिकाणी आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून भव्य मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिर तसेच पीएम जन धन योजनेअंतर्गत नोंदणी यांचे शिबिर घेण्यात आले. हे शिबिर डॉ.कोमल लकडे(मॅडम)सोनाली गायकवाड(मॅडम) प्रतीक्षा मुंडे (मॅडम)यश दळवी(सर) अनुप काळे (सर) अमरदीप खेडकर(सर) हे तज्ञ डॉ.उपस्थित होते तसेच चांदे खुर्द मधील विश्वनाथ गंगावणे, बृहस्पती सूर्यवंशी, परमेश्वर सूर्यवंशी भरत सूर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्तीत होते ग्रामस्थांकडून या शिबिराचा लाभ घेण्यात आला तसेच रोहित दादा पवार यांनी मोफत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे चांदे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.