जिल्ह्यात अवैध जुगार व दारु विरुध्द कारवाई, 12,60,350/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 78 आरोपी ताब्यात! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. 30 मार्च (प्रतिनिधी )
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी व गावठी हातभट्टी व अवैध जुगार चालकांविरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यातील अवैध दारु व जुगार अशा अवैध धंद्यांची माहिती घेवुन कडक कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. दिनांक 26/03/24 ते 29/03/24 दरम्यान स्थागुशा पथकांनी एकुण 66 गुन्हे दाखल करुन 12,60,350/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 78 आरोपी विरुध्द कारवाई केलेली आहे. तसेच स्थागुशा पथक यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई सुरु ठेवणार आहे.
पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे –
दारुबंदी
अ.क्र. पोलीस स्टेशन दाखल मुद्देमाल आरोपी
1. कोतवाली 1 1400 1
2. भिंगार कॅम्प 3 25995 3
3. सुपा 4 10480 4
4. नगर तालुका 5 19320 5
5. एमआयडीसी 5 45995 6
6. श्रीगोंदा 4 85790 6
7. शेवगांव 5 20100 5
8. नेवासा 5 6480 5
9. सोनई 3 22685 3
10. शनिशिंगणापुर 1 2500 1
11. राहुरी 3 163755 6
12. कोपरगांव तालुका 2 7205 2
13. राहाता 2 545985 2
14. संगमनेर शहर 9 19940 11
एकुण 52 977630 60
पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु विरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे –
जुगार
अ.क्र. पोलीस स्टेशन दाखल मुद्देमाल आरोपी
1. तोफखाना 4 133030 8
2. संगमनेर शहर 2 2570 2
3. संगमनेर तालुका 2 3720 2
4. भिंगार कॅम्प 1 32150 1
5. सुपा 1 20320 1
6. शेवगांव 2 88230 2
7. सोनई 2 2700 2
एकुण 14 282720 18
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.