शिवजयंती निम्मित कर्जत येथे सकल मराठा समाज यांच्यावतीने सिनाथडी जत्रेचे आयोजन
१८ रोजी सामुदायिक विवाह सोहळा होणार संपन्न*
कर्जत प्रतिनिधी : दि १२ फेब्रुवारी
सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने रविवार, दि. १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सिनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाच्या शेजारील पीर हजरत दावल मलिक ग्राऊंडवर सदर जत्रेचे आयोजन केले आहे. यासह सकल मराठा समाज शिवजयंती उत्सव समितीद्वारे दि १८ फेब्रुवारी रोजी जत्रेच्या ठिकाणी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे यांनी दिली. सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या हस्ते ऐतिहासिक सिनाथडी जत्रेचे उदघाटन होणार आहे.
मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले असून भारतातील विविध नामांकित ब्रँड्स व प्रमुख संस्थांचा या जत्रेत सहभागी होणार आहे. यासाठी संयोजन समितीने चोख सुरक्षा व्यवस्था राखली आहे. जत्रा परिसरात वॉटरप्रूफ कव्हर्ड तसेच प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. आकर्षक व रचनाबद्ध सुंदर स्टॉल व जत्रेची विविध माध्यमातून सर्वदूर प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच आयोजकांमार्फत प्रत्येक स्टॉलला जनरल इन्शुरन्स सुविधा उपलब्ध केली आहे. लाखो ग्राहकांपर्यंत अल्प खर्चामध्ये आपली उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची ही सुवर्णसंधी आहे त्याचा लाभ व्यावसायिक बंधूनी घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने करण्यात आले आहे.