समाजात महिला असुरक्षित आहेत: पोलिस निरीक्षक गडकरी

अहमदनगर दि.८मार्च (प्रतिनिधी)-जागतिक महिला दिना निमित्त महिलांना खोमणे गुळाचा आरोग्यदायी चहा प्रोफेसर चौक यांचे कडून मोफत चहाचे वाटप करण्यात आले.
या वेळी तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सौ. ज्योती गडकरी म्हणाल्या की आज समाजात महिला असुरक्षित आहेत महिलांना सक्षम बनविणे काळाची गरज आहे.महिला दिन हा एकच दिवस साजरा करून उपयोग नाही तर महिला ही समाजातील व कुटुंबातील मुख्य घटक असून तिचा दिवस नित्य नियमाने साजरा करणे गरजेचे आहे.या वेळी लायन्स मिडटावून क्लबच्या अध्यक्षा सौ.संपूर्णा सावंत,डॉ.आदिती पानसंबळ, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा,सौ.शारदा पवार,सी. ए. सौ. सुनंदा रच्चा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खोमणे गुळाचा चहाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत सौ. वैष्णवी पासकंटी यांनी केले,तर आभार सौ.ऐश्वर्या पासकंटी यांनी मानले.संचालक अथर्व बोज्जा व शुभम पासकंटी यांनी आभार मानून कार्यक्रमा नंतर महिलांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गुळाचा चहाचे मोफत वाटप करण्यात आले.