खुना सारखा गंभीर स्वरुपाचा स्थानिक गुन्हे शाखेने आणला उघडकिस!

अहमदनगर (प्रतिनिधी) पारनेर येथे आठ महिन्यापुर्वी घडलेला खुना सारखा गंभीर गुन्हा
स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की
दिनांक 23/02/2022 रोजी फिर्यादी राहुल राजु लाळगे, वय 27, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. निघोज, ता. पारनेर यांनी त्यांचे हॉटेल मंथनमध्ये वेटर म्हणुन काम करणारा मन्सुर अन्सारी रा. उत्तर प्रदेश राज्य यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने कोणत्यातरी हत्याराने गळ्यावर वार करुन जिवे ठार मारुन पाडळीआळे, ता. पारनेर गांवचे शिवारात, कळस गांवाकडे जाणारे रोडलगत रस्त्याचे कडेला शेतामध्ये मृतदेह टाकुन दिला होता. सदर घटने बाबत पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 130/2022 भादविक 302, 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुना सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा मागील आठ महिन्यापासुन ना उघड असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचा झालेल्या तपासाचा आढावा घेवुन ना उघड खुनाचे गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करणे करीता पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे, पोसई/सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, विशाल दळवी, संतोष लोढे, दिपक शिंदे, पोकॉ/मेघराज कोल्हे, मपोकॉ/भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, ज्योती शिंदे, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर अशांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य समजावुन सांगुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले व पथकास लागलीच रवाना केले. पथक निघोज, देवीभोयरे, वडझिरे, लोणीमावळा, अळकुटी, पाडळीआळे ता. पारनेर तसेच बेल्हे, राजुरी व आळेफाटा, ता. जुन्नर, जिल्हा पुणे परिसरात आरोपींचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करुन गुन्ह्याचा सखोल तपास करत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा संशयीत इसम नामे राजु औटी, रा. वडझिरे, ता. पारनेर याने केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी माहिती पथकास कळवुन आरोपी ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या.
विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन संशयीत इसम नामे राजु औटी रा. क्रांती साखर कारखान्या जवळ, देवीभोयरे, ता. पारनेर यांचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम रस्त्याने पायी येतांना दिसला पोलीस पथक शिताफीने त्यास ताब्यात घेण्याचे तयारी असतांना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागला पथकाने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथक असल्याची ओळख सांगुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी करता त्याने त्याचे नावे राजु ऊर्फ राज प्रभाकर औटी, वय 46 रा. क्रांती साखर कारखान्या जवळ, देवीभोयरे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. नमुद कबुली बाबत तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास करुन सदरचा गुन्हा हा आरोपीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पारनेर पोस्टे येथे हजर केले असुन पुढील कारवाई पारनेर पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.