महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन कृषीप्रधान देशात भांडवलदारांच्या इशार्याने केंद्र सरकार चालते -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, वकिल सेलचे अॅड. योगेन नेमाणे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, अमोल कांडेकर, साधना बोरुडे, गणेश बोरुडे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, माजी नगरसेवक संभाजी पवार, प्रा. भगवान काटे, फारुक रंगरेज, बाळासाहेब बोरुडे, विशाल बेलपवार, अर्जुन चव्हाण, गौतम भांबळ, सागर सोबळे, मोहन गुंजाळ, भगवान काटे, निलेश इंगळे, उमेश धोंडे, सारंग पंधाडे, प्रशांत धलपे, सागर सोबळे आदींसह प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, ब्रिटीशांची हुकुमशाही राजवट महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने उलथवून लावली. देशात सध्या हुकुमशाही राजवट आली असून, भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्यांना दुर्लक्ष केले जात आहे. कृषीप्रधान देशात भांडवलदारांच्या इशार्याने केंद्र सरकार चालत आहे. जेंव्हा सर्वसामान्यांवर अन्याय होतो, तेंव्हा क्रांती घडत असल्याचा इतिहास असून, लवकरच केंद्रातील हुकुमशाही सरकार सर्वसामान्य जनता पाडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.