राजकिय

कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारणी जाहीर

कर्जत दि. 16 जानेवारी (प्रतिनिधी):- सोमवार दिनांक १५ जानेवारी रोजी कर्जत तालुका भाजपची कार्यकारणी आमदार राम शिंदे व खासदार. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केली.
या तालुका कार्यकारणी मध्ये एकूण आठ उपाध्यक्ष,सात चिटणीस, तीन सरचिटणीस, तर काही शहराध्यक्ष, अशी जबाबदारीची पदे यावेळी देण्यात आली आहेत. शेळके युवराज हनुमंत (कोरेगाव),अनारसे रमेश साहेबराव (आळसुंदे), सुरेश माणिक मुढळे (देशमुखवाडी),प्रकाश शिंदे (चापडगाव) संतोष हौसराव निंबाळकर, (पाटेवाडी),संभाजी रोहिदास बोरुडे (कोकणगाव), सुनील नामदेव काळे (करपडी), समीर दत्तात्रय जगताप (कुळधरण),त्याचप्रमाणे तालुका सरचिटणीसपदी दोधाड उर्फ चरपटेनाथ पप्पू शेठ पांडुरंग (कुंबेफळ),निंभोरे राहुल (कुळधरण), दत्तात्रय मुळे (मुळेवाडी) यांची तालुका सरचिटणीस पदी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे सात चिटणीस यांची पुढील प्रमाणे नावे आहेत. फरांडे संतोष (भांबोरा), नवले कल्याण (चिलवडी), सारंग प्रभाकर घोडेस्वार (मिरजगाव), गदादे विष्णू महादेव (कोळवडी), थोरात मंगेश (थेरवडी), अनुभुले विठ्ठल बबन (घुमरी), प्रकाश अमृत पठारे (खांडवी),
त्याचप्रमाणे कर्जत तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी, काकासाहेब पिसाळ (थेरगाव) यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका दीपक महादेव गावडे (चांदाखुर्द) यांची निवड करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी निळकंठ प्रकाश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच कर्जतच्या शहर अध्यक्षपदी क्षीरसागर गणेश नवनाथ यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी श्री शिवाजी हनुमंत काळे व मिरजगावच्या शहराध्यक्षपदी संदीप बुद्धिवंत यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी अनारसे अजित सोपान तर ओबीसी मोर्चा सरचिटणीसपदी पांडुरंग क्षीरसागर यांची यावेळी निवड करण्यात आली आहे.
तसेच वैद्यकीय आघाडीचे प्रमुखपदी काळदाते नंदलाल त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्षपदी गावडे भाऊसाहेब सोपान तर भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीसपदी शिंदे प्रशांत जगन्नाथ यांची निवड करण्यात आली आहे. किसान आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष गणेश चंद्रभान जंजिरे (पिंपळवाडी) किसान आघाडीचे सरचिटणीस पदी परदेशी उदयसिंग पोपटसिंग (कोरेगांव) अनुसूचित जाती जमातीच्या अध्यक्षपदी प्रवीण जनार्दन लोंढे (आंबेजळगाव) सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्षपदी सुनील रामदास पोकळे कर्जतच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ.प्रतिभा सचिन रेणुकर कर्जत शहर तालुका अध्यक्षपदी आशाताई वाघ, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्षपदी अनिल खराडे, दिव्यांग सेल कर्जत अध्यक्षपदी सुभाष गावडे, कर्जत तालुक्याचे अल्पसंख्यांक अध्यक्षपदी फारूक पठाण (टाकळी खंडेश्वरी), यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील सर्व कार्यकारणी तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. यावेळी ते बोलताना भारतीय जनता पार्टी पक्ष हा अतिशय संघटनात्मक दृष्ट्या मजबूत असा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून वरील सर्व कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. असे मत यावेळी व्यक्त केले जेणेकरून संघटनेचे कार्य सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचेल या हेतूने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे असे मत यावेळी तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुका नूतन कार्यकारिणीचे सर्व क्षेत्रातून स्वागत व मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे