उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकारांना अपघाती विमा

कर्जत (प्रतिनिधी) : दि ३१ जुलै उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा डाक विभागाने सुरू केलेला अपघाती विमा स्वखर्चाने काढून दिला. आगळ्यावेगळ्या समाजोपयोगी उपक्रमाने सचिन पोटरे यांनी आदर्श पायंडा निर्माण केला आहे. प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या वतीने दहा लाख रुपयाचा अपघाती विमा कवच तालुक्यातील पत्रकारांना देण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथील सर्व पत्रकारांना प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या वतीने दहा लाख रुपयाचा अपघाती विमा कवच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला. वार्तांकनासाठी पत्रकार कायम घराबाहेर पडत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा कवच असणे आवश्यक असल्याची भावना सचिन पोटरे यांच्या मनात आली. त्यांनी कर्जत डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांच्याशी सवांद साधत डाक विभागाची नूतन अपघाती विमा योजना पत्रकारांसाठी देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोटरे यांनी स्वखर्चाने सदरचा १० लाख रुपयांचा विमा पत्रकारांना दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका समन्वयक पप्पू धोदाड होते. यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकारांसह भाजपा किसान मोर्च्याचे सुनील यादव, उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख, गणेश क्षीरसागर, ज्ञानदेव लष्कर, शरद म्हेत्रे, गणेश पालवे, संभाजी गोसावी, बाळासाहेब बाळुंजकर, दिलीप खरात, सुनील धस, बापूराव पंडित, संतोष गदादे, दीपक काळे, चंद्रकांत नेटके, अशोक बंडगर, प्रफुल वाघमारे, ज्ञानदेव तांदळे, संगीता भवर, सुरज तोरडमल, शाहरुख सय्यद आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार, होर्डिंग, बॅनर, फोटोशेसन व जाहिरातबाजी न करता सामाजिक उपक्रमांनी साजर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार कर्जत येथे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.