आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी करुन निवड करणार!जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे

अहमदनगर दि.३१ जुलै ( प्रतिनिधी):-आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका निमित्ताने अहमदनगर दक्षिण जिल्हा दौरा संपन्न झाला.या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष आद.बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी जिल्हाध्यक्ष आणी प्रभारी यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून त्यांची उमेदवारी निश्चित करण्याचे आदेश आठ ते दहा दिवसांपूर्वी दिले आहेत.राष्ट्रीय कार्यकारिणीने दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश साठे जिल्हा महासचिव,महिला आघाडी समन्वयक धनश्री शेंडगे,जीवन पारधे सह प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच तालुकाध्यक्ष आणि सर्व कार्यकारणी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सलग फिरून उमेदवारांची चाचपणी करून योग्य उमेदवार वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीला देणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी दिली.