विकास कधीही न थांबणारी प्रक्रिया : माजी आ. विजय औटी

पारनेर दि.२७ जून (प्रतिनिधी)
जामगाव ता. पारनेर येथील रामा-६६, डिकसळ ते जामगाव रस्ता नवीन पुलासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ग्रामा-६७) सा.क्र. ४/० ते ९/० – ३० लक्ष रुपये हा जामगाव- पारनेर रस्त्यावरून सोबले वस्ती कडे जाणारा असुन रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार विजय राव औटी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एखादा रस्ता किंवा कोणतेही काम केल्यास काही दिवसांनी ते खराब होते हीच विकासाची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मी तालुक्यात प्रचंड विकासाची कामे केली जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या माध्यमातून दाते सरांनी तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला याचे आपण सर्व साक्षीदार आहात.
अध्यक्षीय भाषणात हे सभापती दाते सर म्हणाले सोबलेवस्ती जवळपास दोनशे लोकवस्तीची आहे येथील ग्रामस्थांनी माजी चेअरमन बाळासाहेब सोबले यांचे नेतृत्वाखाली येऊन रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती. सोबलेवस्ती वरून डिकसळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाझर तलावाचे पाणी येत आहे त्यामुळे येथील वस्तीतील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी या पाण्यातून जावे लागत होते त्या ठिकाणी सी.डी वर्क करून रस्ता झाल्यास येथील लोकांची कायमस्वरूपीची अडचण दूर होईल यावेळी तुषार उर्फ पप्पू बांगर यांना शिवसेना उपतालुका प्रमुख पदी नियुक्त झाल्याने त्यांचा सन्मान शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
**** दाते सर अडीच वर्षांपूर्वी सभापती झाले. या तालुक्यात विकास कामे फार मोठ्या प्रमाणावर झाली. कामाचा प्रचंड ओघ औटी साहेबांनंतर दाते सरांनी केलेला आहे. समाजकारणातही शिवसेना आघाडीवर आहे. आजचा दिवस हा समाजासाठी काही करता येईल का, याचा विचार आम्ही करतो : रामदास भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख तुषार बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज माळी, बाळासाहेब सोबले, डिकसळ सरपंच भाऊसाहेब चौधरी, जामगाव चे उपसरपंच शांताबाई शिंदे, ग्राम. सदस्य आप्पा मेहेर, कैलास शिंदे, रोहिदास चौधरी, वैशाली बांगर, सेवा सोसा. चेअरमन नवनाथ बांगर,व्हा. चेअरमन सुनीता नाईक, सदस्य रावसाहेब सोबले, बंडू औटी, कुंडलिक बर्वे, सोपान मुंजाळ, दिलीप सोबले, विष्णू नाईक, दत्ता घोडे, लक्ष्मीबाई घोडे, पोपट बांगर, बाबासाहेब बांगर, सागर बर्वे, विठ्ठल सोबले, रमेश सोबले, पोपट सोबले, भानुदास सोबले, पांडुरंग सोबले, दिनकर सोबले, शिवाजी सोबले, काशिनाथ सोबले, उत्तम सोबले, दत्ता सोबले, बटू सोबले, किरण सोबले, वैभव सोबले, सिताराम खोडाळ, बाबू पवार, श्रीकांत सोबले, प्रदीप सोबले, सोमनाथ सोबले, अक्षय सोबले, संकेश सोबले, अजिंक्य सोबले, दादाभाऊ सोबले, नाना झरेकर, प्रवीण सोबले, स्वप्निल सोबले, गणेश सोबले, अनिकेत सोबले, महादेव सोबले मेजर, कामाचे ठेकेदार फारुक शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब बांगर यांनी केले तर आभार बाळासाहेब सोबले यांनी मानले.