कलयुगात ३५ हजार ग्रहणे होतील मुलस्तंभ नावाचा ग्रंथ वाचा: आदिनाथ महाराज पालवे

घाटशिरस दि.२८ (प्रतिनिधी) घोर कलयुग आलेले आहे.या कलयुगात सूर्यग्रहण,चंद्रग्रहण तसेच वेगवेगळी ३५ हजार ग्रहणे होतील.
मुलस्तंभ नावाचा ग्रंथ वाचा असे प्रतिपादन आदिनाथ महाराज पालवे (वृधेश्वर) यांनी केले.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जगणाथ बर्डे यांच्या पत्नी मंडाबाई बर्डे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त आयोजित प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संस्थापक संपादक महेश भोसले,जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे,घाटशिरस गावचे सरपंच पालवे,तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलतांना पालवे महाराज म्हणाले,ग्रहण लागल्यावर मंत्र
उजळावे लागतात.हे शास्त्र सांगते.पूर्वी पहाटेच्या वेळेसच कोंबड कोकत असत, मात्र कलयुगात कोणत्याही वेळेला दिवसासुध्दा कोंबड कोकतय यालाच घोर कलयुग म्हणतात.
एकदा एक गरीब माणूस एका मित्राच्या घरी कार्यक्रमाला गेला त्यावेळी बाकीच्यांनी त्याच्या गरिबीची थट्टा करत तू इथे कसा? असे विचारल्यावर माझा सोबती मोठा आहे.म्हणून मी मोठा आहे.सांगायचे तात्पर्य असे की माणसे विचारणे मोठी व छोटी असतात.दूर असणारा माणूस दारात येणे हे ज्याने कार्यक्रम घेतला आहे.त्या माणसाचे मोठेपण असते.या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.त्यानंतर प्रवचनाला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांना अन्नदान देण्यात आले.कार्यक्रमास परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.